महा भूलेख महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक (Online property card) व जमीन मोजणीची क-प्रत पहा. थोडक्यात bhulekh.mahabhumi.gov.in वेबसाईटवर आपल्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे.
योजनेचे नाव: | Mahabhulekh Mahabhumi abhilekh, Bhulekh Maharashtra |
कोणा द्वारे सुरु झाली: | महाराष्ट्र शासन महसूल विभाग |
हितकारक: | महाराष्ट्राचे नागरिक, भूधारक, जमिनीचे मालक व इतर |
योजनेचा उद्देश: | भूमि अभिलेख जमिनी संबंधित माहिती प्राप्त करणे |
अधिकृत वेबसाइट लिंक: | bhulekh.mahabhumi.gov.in |
MAHA Bhulekh Mahabhumi: महाराष्ट्र भूमी अभिलेख
MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh Maha Abhilekh) महाराष्ट्र राज्याची वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा आणि मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक(property card) व जमीन मोजणीची क-प्रत संबंधित माहिती ही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. आपल्याला आपल्या मालकीच्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या मालकीच्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते.

Mahabhulekh v2.0 Bhumi Abhilekh नवीन अपडेट आला आहे. या ठिकाणी अधिकार अभिलेख प्रकारामध्ये जमीन मोजणी क-प्रत (K-Prat) अधिकार अभिलेख या पोर्टलवर नवीन जोडला आहे.
गाव नमुना नंबर 7/12 उतारा कसा बघावा?
गाव नमुना नंबर ७/१२ पहाण्यासाठी या ठिकाणी दोन पद्धत दिलेली आहे.
- त्यापैकी पहिल्या पद्धतीत जर तुम्हाला 11 अंकी प्रॉपर्टी यूआयडी क्रमांक माहीत असेल तर Property UID Number टाईप करा.
- मोबाईल नंबर लिहा.
- सांकेतिक क्रमांक(Captcha) बरोबर टाईप करा.
- या पद्धतीत आपण सातबारा अगदी सोप्या पद्धतीने बघू शकतो.

- ऑनलाईन विना स्वाक्षरीत सातबारा 7/12 उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.

- आपला जिल्हा निवडा. (उदाहरणार्थ- ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा पुणे, जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर)
- वरील प्रमाणे जिल्हा निवडल्यानंतर तालुका व गाव निवडा.
- सातबारा उताऱ्याचा शोध घेण्यासाठी Mahabhulekh v2.0 वेबसाईट वर आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर (Survey/Gat Number) व नाव(Name) असे पर्याय दिसतात.
- जर आपल्याला जमिनीचा सर्वे नंबर/गट नंबर माहित नसेल तर नाव(Name) हे रेडिओ बटन सिलेक्ट करा.
- नाव(Name) या रेडिओ बटनचा वापर म्हणजे आपले नाव टाईप करून आपले नाव शोधा.
- या ठिकाणी सर्वात सोपा पर्याय सर्वे नंबर/गट नंबर निवडा.
- गट नंबर सर्वे नंबर टाईप केल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा.
- आपला योग्य गट नंबर सर्वे नंबर निवडा कारण काही गटांमध्ये अ, ब, क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय असतात.
- सातबारा उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर योग्य पद्धतीने टाईप करा.
- आपल्याला सातबारा उतारा ज्या कोणत्या भाषेत हवा असेल ती भाषा निवडा या ठिकाणी आपल्याला 23 ते 24 भाषा दिलेल्या आहेत.
- सांकेतिक क्रमांक (Captcha) योग्य पद्धतीने बरोबर टाईप करा व Submit टॅब वर क्लिक करा.
- या ठिकाणी गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच सातबारा(7/12) आपल्यासमोर आहे.

Read Also: Digitally signed 7 12, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक Online पहा- digitalsatbara.mahabhumi.gov.in
- महाभुलेख महाभुमी वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
- कायदेशीर व शासकीय वापरासाठी सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर मिळेल.
8अ उतारा जमाबंदी पत्रक Online बघा
- ऑनलाइन 8अ उतारा पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल विभागाची महाभुमी वेबसाईट- bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.

- आपला जिल्हा निवडा. (उदाहरणार्थ पुणे, जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर)
- योग्य जिल्हा निवडल्यानंतर तालुका, गाव निवडा.
- खाते क्रमांक(Khata Number) व नाव(Name) या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
- खाते क्रमांक निवडल्यानंतर खाता क्रमांक शोधा व सिलेक्ट करा.
- किंवा नाव रेडिओ बटन निवडला असेल तर पहिले नाव मधले नाव आडनाव संपूर्ण नाव निवडा व शोधा.
- 8अ माहिती (8A details)साठी या ठिकाणी मोबाईल नंबर लिहा.
- सांकेतिक क्रमांक(Captcha) टाईप करा व सबमिट बटणावर क्लिक करा.
- आपल्यासमोर गाव नमुना आठ-अ धारण जमिनींची नोंदवही (कृषिक) आसामीवार–खतावणी जमाबंदी पत्रक दिसत आहे.

- भुलेख महाभुमी वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
- कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी 8 अ उतारा महाभुमी वेबसाईटवर मिळेल.
मालमत्ता पत्रक (Property Card) ऑनलाईन पहा
- मालमत्ता पत्रक(property card) ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.

- Online property card पाहण्यासाठी जिल्हा निवडा (उदाहरणार्थ पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर)
- आपला योग्य जिल्हा निवडल्यानंतर तालुका, गाव निवडा.
- CTS No. /न. भु.क्र, पहिले नाव, मधील नाव, आडनाव व नाव शोधा यापैकी कोणत्याही एका ची निवड योग्य पद्धतीने करा.
- मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाण्यासाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर व सांकेतिक क्रमांक(Captcha) टाईप करा.
- महाराष्ट्र जमीन महसूल( गाव, नगर व शहर भूमापन) नियम, 1969 यातील नियम 7 नमुना “ड” म्हणजेच मालमत्ता पत्रक आपल्यासमोर दिसत आहे.

जमीन मोजणी क-प्रत(K-Prat) ऑनलाईन पहा
- जमीन मोजणीची क-प्रत (K-Prat) ऑनलाईन पाहण्यासाठी प्रथम भूमि अभिलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
- आपला जिल्हा निवडा (उदाहरणार्थ- पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर,अमरावती, नागपूर)
- योग्य जिल्हा निवडल्यानंतर तालुका, गाव निवडा.
- यानंतर संकलन(Category) मध्ये नागरी भूमापन व भूमापन यापैकी पर्याय निवडा.
- मोजणीचा प्रकार(Purpose)- हद्द कायम, पोटहिस्ता, बिगर शेती, भूसंपादन, गुंठेवारी, कोर्टवाटप, कोर्ट कमिशन, जमीन प्रदान, शासकीय यापैकी एक निवडा.
- मोजणीचा कालावधी प्रकार(Priority) सिलेक्ट करा- नियमित, तातडी, अतितातडी, अतिअतितातडी यापैकी एक निवडा.
- मोजणी रजिस्टर (मो.र.) क्रमांक(Registration No.) योग्य पद्धतीने लिहा.
- अधिकार अभिलेख क-प्रत माहिती पाहण्यासाठी मोबाईल नंबर लिहा भाषा निवडा.
- सांकेतिक क्रमांक(Captcha) टाईप करा व सर्च बटणावर क्लिक करा.
- आपल्यासमोर क-प्रत माहिती दिसत आहे.

महाभुलेख सातबारा उतारा साठी वेबसाईट लिंक
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाची शासकीय वेबसाईट लिंक खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्रातील महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे-
महसूल विभाग | विभाग अंतर्गत येणारे जिल्हे | |
1 | अमरावती विभाग: | अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम |
2 | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग: | धाराशिव (उस्मानाबाद), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
3 | कोंकण विभाग: | ठाणे, पालघर, मंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग |
4 | नागपुर विभाग: | गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा |
5 | नाशिक विभाग: | अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक |
6 | पुणे विभाग: | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
Related Links:
Aapli Chawdi 7/12 Ferfar डिजिटल नोटीस बोर्ड महसूल विभाग
FAQs:
प्रत्येक नागरिकासाठी Online Satbara बघणे झाले आहे अगदी सोपे.
सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in महाभुमी साईट ओपन करा.
ऑनलाईन ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा- (पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक)
यानंतर या ठिकाणी आपला तालुका व गावाची निवड करा.
तुमच्या जमिनीचा योग्य सर्वे नंबर/ गट नंबर/ नाव लिहा.
दहा अंकी मोबाईल नंबर लिहा, सांकेतिक क्रमांक(Captcha) टाईप करा व सबमिट बटणावर क्लिक करा.
आपण शोध घेत असलेला ऑनलाईन सातबारा Maha abhilekh आपल्यासमोर आहे.