महाभुलेख 7/12 उतारा व 8अ मालमत्ता पत्रक Online पहा bhulekh.mahabhumi.gov.in

महा भूलेख महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक (Online property card) पहा. थोडक्यात bhulekh.mahabhumi.gov.in वेबसाईटवर आपल्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे.

🌏 योजनेचे नाव:महा भूलेख महाभूमि, Mahabhumi abhilekh, Bhulekh Maharashtra
🌏 कोणा द्वारे सुरु झाली:महाराष्ट्र शासन महसूल विभाग
🌏 हितकारक:महाराष्ट्राचे नागरिक, भूधारक, जमिनीचे मालक व इतर 
🌏 योजनेचा उद्देश:भूमि अभिलेख जमिनी संबंधित माहिती प्राप्त करणे 
🌏 अधिकृत वेबसाइट लिंक:bhulekh.mahabhumi.gov.in

MAHA Bhulekh Mahabhumi: महाराष्ट्र भूमी अभिलेख

MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh Maha Abhilekh) महाराष्ट्र राज्याची वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा आणि मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक(property card) संबंधित माहिती ही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. आपल्याला आपल्या मालकीच्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या मालकीच्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते. 

महाभुलेख 7 12 उतारा व 8 अ मालमत्ता पत्रक ऑनलाइन पहा

गाव नमुना नंबर 7/12 उतारा कसा बघावा?

 • ऑनलाईन विना स्वाक्षरीत सातबारा 7/12 उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
ऑनलाईन विना स्वाक्षरीत सातबारा उतारा पाहण्यासाठी महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा
 • आपला विभाग निवडा. (अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
 • वरील प्रमाणे विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
 • सातबारा उताऱ्याचा शोध घेण्यासाठी या वेबसाईट वर आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव असे पर्याय दिसतात. आपल्याला गावातील एकूण नावे म्हणजे संपूर्ण गावातील सातबारे ची यादी पाहायची असेल तर संपूर्ण नाव हा पर्याय निवडा. 
 • या ठिकाणी सर्वात सोपा पर्याय सर्वे नंबर/गट नंबर निवडा. 
 • गट नंबर सर्वे नंबर टाईप केल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा. 
 • आपला योग्य गट नंबर सर्वे नंबर  निवडा कारण काही गटांमध्ये अ, ब, क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय असतात.
 • सातबारा उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर योग्य पद्धतीने टाईप करा.
 • Captcha योग्य पद्धतीने बरोबर टाईप करा व Verify captcha to view 7/12 वर क्लिक करा.
 • या ठिकाणी गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच सातबारा(7/12) आपल्यासमोर आहे.
mahabhulekh सातबारा उतारा

Read Also: Digitally signed 7 12, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक Online पहा- digitalsatbara.mahabhumi.gov.in

 • महाभुलेख महाभुमी वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
 • कायदेशीर व शासकीय वापरासाठी सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर मिळेल. 

8अ उतारा जमाबंदी पत्रक Online बघा 

 • ऑनलाइन 8अ उतारा पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल विभागाची महाभुमी वेबसाईट- bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
8अ उतारा जमाबंदी पत्रक
 • आपला विभाग निवडा  (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
 • योग्य विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
 • आपला खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.
 • 8अ नोंदणीसाठी या ठिकाणी मोबाईल नंबर लिहा व 8अ पहा या टॅबवर क्लिक करा.
 • कॅपच्या योग्य पद्धतीने बरोबर टाईप करा व Verify captcha to view 8A वर क्लिक करा.
 • आपल्यासमोर गाव नमुना आठ-अ धारण जमिनींची नोंदवही (कृषिक) आसामीवार–खतावणी जमाबंदी पत्रक दिसत आहे.
गाव नमुना नंबर 8अ
 • भुलेख महाभुमी वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
 • कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी  8 अ उतारा महाभुमी वेबसाईटवर मिळेल. 

मालमत्ता पत्रक (Property Card) ऑनलाईन पहा 

 • मालमत्ता पत्रक(property card) ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाहण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा
 • Online property card पाहण्यासाठी विभाग निवडा  (अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
 • आपला योग्य विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
 • CTS No. /न. भु.क्र, पहिले नाव, मधील नाव, आडनाव व नाव शोधा यापैकी कोणत्याही एका ची निवड योग्य पद्धतीने करा.
 • मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाण्यासाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर व कॅपच्या टाईप करा.
 • महाराष्ट्र जमीन महसूल( गाव, नगर व शहर भूमापन) नियम, 1969 यातील नियम 7 नमुना “ड” म्हणजेच मालमत्ता पत्रक आपल्यासमोर दिसत आहे. 
ऑनलाइन मालमत्ता पत्रक Online property card

महाभुलेख सातबारा उतारा साठी वेबसाईट लिंक 

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाची शासकीय वेबसाईट लिंक खालीलप्रमाणे आहेत.

बुलढाणाhttps://buldhana.nic.in/
अकोलाhttps://akola.gov.in/mr/service/सातबारा७-१२/
वाशिमhttps://washim.gov.in/service/सातबारा-7-12/
अमरावतीhttps://amravati.gov.in/mr/service/भूमिअभिलेख-व-७-१२-उतारा/
यवतमालyavatmal.gov.in/mr/service/भूमी-अभिलेख-व-७-१२-उतारा/
नांदेड़nanded.gov.in/service/सातबारा/
हिंगोलीhingoli.nic.in/mr/
परभणीhttps://parbhani.gov.in/mr/service/भूमी-अभिलेख/
जालनाhttps://jalna.gov.in/
छ. संभाजीनगर(औरंगाबाद)https://aurangabad.gov.in/
बीडhttps://beed.gov.in/service/सातबारा७-१२/
लातूरhttps://latur.gov.in/en/service/satbara7-12/
धाराशिव (उस्मानाबाद)https://osmanabad.gov.in/mr/service/7-12-पहा/
ठाणेhttps://thane.nic.in/mr/service/संगणकीकृत-७-१२/
मुंबई उपनगरhttps://mumbaisuburban.gov.in/mr/service/7-12-पहा/
रायगडhttps://raigad.gov.in/service/सातबारा-७-१२/
रत्नागिरीhttps://ratnagiri.gov.in/
पालघरhttps://palghar.gov.in/mr/
वर्धाhttps://wardha.gov.in/
नागपूरhttps://nagpur.gov.in/mr/
भंडाराhttps://bhandara.gov.in/
गोंदियाhttps://gondia.gov.in/mr/
गडचिरोलीhttps://gadchiroli.gov.in/mr/
चंद्रपूरhttps://chanda.nic.in/mr/service/land-records-7/
नंदुरबारhttps://nandurbar.gov.in/mr/
धुलेhttps://dhule.gov.in/service/land-records/
जलगांवhttps://jalgaon.gov.in/
नासिकhttps://nashik.gov.in/mr/
अहमदनगरhttps://ahmednagar.nic.in/
पुणेhttps://pune.gov.in/mr/service/७-१२-बघणे/
सोलापुरhttps://solapur.gov.in/
साताराhttps://www.satara.gov.in/service/भूमी-अभिलेख-आपला-७-१२-पहा/
कोल्हापूरhttps://kolhapur.gov.in/service/7-12-ऑनलाइन/
सांगलीhttps://sangli.nic.in/

महाराष्ट्रातील महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे-

 महसूल विभागविभाग अंतर्गत येणारे जिल्हे
1अमरावती विभाग:अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम
2छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग:धाराशिव (उस्मानाबाद), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली
3कोंकण विभाग:ठाणे, पालघर, मंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग
4नागपुर विभाग:गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा
5नाशिक विभाग:अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक
6पुणे विभाग:कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर

Aapli Chawdi 7/12 Ferfar डिजिटल नोटीस बोर्ड महसूल विभाग

FAQs:

ऑनलाईन सातबारा कसा बघावा ?

प्रत्येक नागरिकासाठी Online Satbara बघणे झाले आहे अगदी सोपे.
सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in महाभुमी साईट ओपन करा.
ऑनलाईन सातबारा पाहण्यासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी योग्य विभाग निवडा.
यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा तालुका व गावाची निवड करा.
तुमच्या जमिनीचा योग्य सर्वे नंबर/ गट नंबर/ नाव लिहा.
दहा अंकी  मोबाईल नंबर लिहा व व्हेरिफिकेशन कैप्चा टाईप करा.
आपण शोध घेत असलेला ऑनलाईन सातबारा Maha abhilekh आपल्यासमोर आहे.७-१२

Scroll to Top